शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ नुकसान भरपाई द्या – खा. रजनीताई पाटील

शेतकऱ्यांना सरसगट तात्काळ नुकसान भरपाई द्या – खा. रजनीताई पाटील

केज दि २३( प्रतिनिधी)

मागील पंधरा दिवसापासून बीड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेती मातीसगट वाहून गेली आहे. जनावरे गुरे वाहून गेली आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या
खा.रजनीताई अशोकराव पाटील यांनी प्रशासनाने सरसकट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्याला तात्काळ मदतीची गरज आहे. करून शेतकऱ्यांना सरसगट मदत मिळाली पाहिजे थेट मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी याबाबत मागणी करून संवाद साधला आहे.

पुढे बोलताना खा. पाटील म्हणाल्या की, शासनाने तत्परतेने कार्यवाही केली नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल. त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांमधून तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून सर्व स्तरांवर लढा देण्याचा निर्धार खा. रजनीताई पाटील यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव बांधील असून, नुकसान भरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा
करत राहणार असल्याचे सांगितले.

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!