झुंजार पत्रकार संघात अनिल गलांडे व सचिन साखरे यांची निवड
केज! प्रतिनिधी
केज येथील झुंजार पत्रकार संघ हा अल्पावधीत नावारुपास आलेल्या संघ आहे , झुंजार पत्रकार संघामध्ये दै.तरुण भारत चे केज तालुका प्रतिनिधी अनिल गलांडे आणि सचिन साखरे यांची झुंजार पत्रकार संघात निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान, सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन झुंजार पत्रकार संघाचे ज्येष्ठ सतीश केजकर ,व महादेव दळवे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बोलताना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा झुंजार पत्रकार संघास मजबूत करण्यासाठी आणि पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निश्चितच होईल.”
आपल्या निवडीनंतर अनिल गलांडे व सचिन साखरे यांनी झुंजार पत्रकार संघाचे आभार मानले. “पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणे आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहणे हेच आमचे प्राथमिक ध्येय असेल,” असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या निवडीचे वृत्त समजताच पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अनिल गलांडे आणि सचिन साखरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी झुंजार पत्रकार संघाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष दशरथ चवरे,सचिव रमेश इतापे, जेष्ठ पत्रकार सतीश केजकर,महादेव दळवे, विनायक ठोंबरे, दत्तात्रय हंडिबाग, नंदकुमार मोरे, दिनकर राऊत मुबशीर खतीब, दादासाहेब आगे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
सोबत, फोटो








Leave a Reply