कुंबेफळ येथे विठ्ठल बिरुदेव भंडारा परज कार्यक्रम संपन्न
केज दि १२(प्रतिनिधी)
तालुक्यातील कुंबेफळ येथे प्रती वर्षाच्या परंपरेनुसार यावर्षी रविवार रोजी श्री विठ्ठल बिरुदेवाच्या भंडाऱ्या चे आयोजन करण्यात आले.
धनगरी ओवीगायन कार्यक्रम संपन्न झाला.
ढोल, झांज,अब्दागिरी व छत्री,आणि निशान पताका घेऊन सलग पाऊल खेळत ही भंडाऱ्याची उधळण करत परज निघाली.
बिरुदेव वीर देवांचा हेडाम पार पडले त्यानंतर महाप्रसाद झाला या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात वीरकरी नागरीक उपस्थित होते.
गावातील ग्रामस्थ, सर्व क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो








Leave a Reply