आ.सौ. नमिता ताई मुंदडा यांना कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात सहकार्याबाबत मागणी

आ.सौ. नमिता ताई मुंदडा यांना कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात सहकार्याबाबत मागणी

 

जमियतुल कुरेशी च्या विविध मागण्यांबाबत दिले आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांना निवेदन

 

केज/प्रतिनिधी

 

केज मतदार संघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांना जमियतुल कुरेशी समाजांने होत असलेल्या अन्यायाचे निवेदन दिले या बाबत सविस्तर माहिती आशी कि कुरेशी समाज हा पारंपरिकपण कायद्याचे अधिन राहुन म्हैस व बैल या सारख्या कृषी जनावरांच्या खरेदी-विक्री व्यावसायत संलग्न आहे. आम्ही सर्व समाज बाधंव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दाखले, वाहतुक परवाने, पशुवैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आदि सर्व कायदेशीर बाबींचे पालन महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार नियमितपणे करत आहात.परंतु अलीकडील काळात काही संघटना व व्यक्ती आमचं सर्व समाजास अतिरकी पध्दतीने अन्याय करत आहे, आमचं समाज बांधवना रस्त्यावर अडवून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करण, मारहाण करणं व मॉबलिचिंग सारखं गंभीर प्रकार घडविलं जात आहे.वरील सर्व परिस्थती पहाता बीड जिल्हातील सर्व कुरशी बांधवानी एकमताने एकमुख्यी निर्णय घेतला असून की सर्व प्रकारचे जनावरांचा बाजार बंद व कोणतंही प्रकारचे जनावरांचा खरदी-विकी करण बंदचा निर्णय घेण्यात आलंला आहे. यातुन महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचं मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान होत आहे व झाले आहे. व मास एक्स्पोर्ट च्या कंपन्या बंद पड़त आहे. याचा मोठा फटकाराज्याच्या तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायपासून आपला भारत देश जगात सर्वात जास्त बीफ एक्स्पोर्ट करणारा दुस-या क्रमांकाचा देश आहे. परंतु जर सदरहू समाजावर अन्याय सुरुच राहिला व मागन्या पुर्ण नाही झाल्या तर हा समाज खरेदी विक्री करणार नाही.आशा आशयाचे निवेदन आमदार सौ नमिताताई मुंदडा यांना देण्यात आले असुन तात्काळ निर्णय न झाल्यास शेतकरी व्यापारी यांचे मोठे नुकसान होत आहे तरी या यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!