बँकेसमोरील पुरातन विहीर बुजवण्याच्या विरोधात ४ दिवसांपासून आमरण उपोषण            खा. बजरंग सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट

बँकेसमोरील पुरातन विहीर बुजवण्याच्या विरोधात ४ दिवसांपासून आमरण उपोषण

खा. बजरंग सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट

 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

 

शहरातील महाराष्ट्र बँकेशेजारी जुनी पुरातन विहीर अनेक वर्षापासून होती. ही विहीर नगर परिषदेने बुजवुन त्याठिकाणी अनाधिकृतपणे गाळे बांधकाम करुन ते भाडेतत्वावर दिलेले आहेत. सदरील जागेवरील अतिक्रमण काढून विहीर मोकळी करुन विहीर पुर्वरत सुरु करावी या मागणीसाठी नगरपालिके समोर लोकजनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांने उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास खा. बजरंग सोनवणे यांनी रविवार भेट दिली.

महाराष्ट्र बँकेसमोर असलेली विहीर बुजवून त्याठिकाणी सुरु केलेले गाळे बंद करुन विहीर मोकळी करण्यासाठी नगर पालिकेला निवेदन देण्यात आले होते. तसेच सर्व अंबाजोगाई शहरामध्ये भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते. परंतु नगर परिषदेने याची दखल न घेता सदर अतिक्रमण अद्यापपर्यंत काढलेले नाही. या विरोधात लोकजनशक्ती पार्टी युवक आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक बन्सी काळे पाटील यांनी मागील ४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील चार दिवसापासून तोडगा निघाला नसल्याने आमरण उपोषण सुरुच आहे.

खा. बजरंग सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट

पुरातन वारसा असलेल्या विहिरीच्या जपणुकीसाठी सुरु असलेला हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीले पाहीजे हे ओळखून खा.बजरंग सोनवणे यांनी उपोषण कर्ते अशोक बन्सी काळे पाटील यांची उपोषण स्थळी जाऊन चौकशी केली. यावेळी खा. सोनवणे यांच्या बरोबर माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमूख, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाव्हुळे, इस्माईल गवळी, मदनलाल परदेशी, रवी देशमुख, हमीद चौधरी, गणेश घाडगे इत्यादी उपस्थित होते.

नगरपालिकेचे लेखी आश्वासन, परंतू उपोषण सुरुच

खा. बजरंग सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी उपोषण कर्ते अशोक बन्सी काळे पाटील यांना मुख्याधिकरी यांनी दिलेले लेखी पत्र दिले. परंतू दिलेल्या पत्रात विहीरीवरील अतिक्रमण काढणार म्हणून ठोस आश्वासन दिलेले नाही. यामुळे उपोषण मरेपर्यंत सुरु राहील असे उपोषणकर्ते काळे यांनी लेखी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!