साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्य वाटप
सारणी येथील सरपंच ओव्हाळ यांचा स्थुत्य उपक्रम
केज | प्रतिनिधी
केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संपुर्ण विद्यार्थ्यांना सरपंच एस.आर.ओव्हाळ यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी येथील शिक्षक हारेष कांबळे, अंगणवाडी शिक्षिका सुमल घोळवे, अंगणवाडी सेविका रमाबाई ओव्हाळ, राहूल ओव्हाळ, नि.मुख्याद्यापक अभिमान घोळवे, रामहारी मुळे, चंद्रसेन देशमुख, ग्रा.पं.सदस्य विलास घोळवे, ग्रा.रो.सेवक गोपाळ ठोंबरे, बाबू भांगे, श्रीकांत भांगे, चंद्रकांत मुजमुले, बप्पा भांगे, सुदर्शन भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.








Leave a Reply