लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या हस्ते संपन्न
मतिमंद व मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अल्पपोहाराचे केले वाटप
केज/प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले तर मतिमंद व मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले.
केज शहरातील सिद्धार्थ नगर भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कै. प्रमोद लांडगे युवा मंचच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा.सौ.सीताताई बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रोहित कसबे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रीतम खरात, पत्रकार दशरथ चवरे, पत्रकार तात्या गवळी, युवा नेते, लखन हजारे, विवेक बनसोड, किरण जोगदंड वंचितचे प्रवीण मस्के यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकीत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मतिमंद व मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी मतिमंद निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जनाबाई जाधव मॅडम, मूकबधिर निवासी विद्यालयाच्या सूर्यवंशी मॅडम, काकासाहेब जगदाळे, अशोक सुरवसे, विशाल कदम, दुंबक पवार, ओके सर, बोधले सर, पवार सर, शिंदे सर, श्रीमती आंधळे मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, पालवे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष,सचिव, पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.








Leave a Reply