राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज शहराध्यक्षपदी अझरोद्दीन इनामदार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज शहराध्यक्षपदी अझरोद्दीन इनामदार यांची निवड

केज : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) केज शहराध्यक्षपदी इनामदार अझरोद्दीन बशिरोद्दीन शेख यांची निवड दि.२८ जुलै २०२५ रोजी करण्यात आली आहे.त्यांना जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे,माजी मंत्री तथा आ.धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण यांनी इनामदार अझरोद्दीन यांच्यावर केज शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.केज शहरातील लोकप्रिय नगरसेवक म्हणून इनामदार अझरोद्दीन यांची ओळख आहे. त्यांनीमागील अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व राजकीय आपला ठसा उमटविला आहे.त्यांचे युवकांचे संघटन मोठे आहे.त्यांच्या निवडीचा पक्षाला फायदा होणार असून कार्यकत्यां मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार तळागाळात पोहचवून पक्ष वाढीसाठी व सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू,असे इनामदार अझरोद्दीन यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!