मराठवाड्यातील रेल्वेमार्ग,सुविधा आणि थांब्यांची मागणी तात्काळ पूर्ण करा —- खा.रजनीताई पाटील

मराठवाड्यातील

रेल्वेमार्ग,सुविधा आणि थांब्यांची मागणी तात्काळ पूर्ण करा —- खा.रजनीताई पाटील

 

 

केज प्रतिनिधी,

पुणे येथे रेल्वे समितीची बैठक सोमवार रोजी झाली.

बैठकीत खा रजनीताई पाटील यांनी मराठवाड्यातील रेल्वेविकास संदर्भी बीड,लातूर,धाराशिव यांसह विविध जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न मांडून अनेक मागण्या मांडल्या.

यावेळी रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना साहेब, खासदार डॉ. सुप्रियाताई सुळे, खासदार श्री श्रीरंग आप्पा बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार श्री निलेश लंके, खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील,आदी उपस्थित होते.

घाटनांदूर-अंबाजोगाई-केज-नेकनूर-मांजरसुंभा-पाटोदा-आष्टी-जामखेड-कर्जत-श्रीगोंदा(दौंड) रेल्वे मार्ग. (संरक्षण मंजूर सर्वेक्षण

सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद- लातूर- अंबाजोगाई- परळी- सोनपेठ- पाथरी- मानवत- पाचलेगाव- जिंतूर- औंढा नागनाथ- नरसी- हिंगोली मार्ग, परळी, लातूर रेल्वे स्थानकावरून योग्य रेल्वे मार्ग जोडून व्यावसायिक आणि पर्यटन क्रियाकलाप वाढविण्यासाठी मराठवाडा मागास प्रदेशाला विदर्भ आणि उत्तर भारताशी म्हणजेच दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, मध्यप्रदेश इत्यादींशी जोडणे.

विकाराबाद-बिदर-लातूर-कुर्डुवाडी हा मार्ग/ट्रॅक गेल्या दहा वर्षांपासून सुरू झाला आहे,

अजूनही खूप कमी प्रवासी गाड्या आहेत. या मार्गाचा वापर नवीन गाड्यांसाठी केला जाऊ शकतो ज्या

विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद ते मुंबई/पुणे दरम्यान धावू शकतात.

आदी विषय मांडले

लवकरच नवीन रेल्वे मार्ग मंजूर होतील असे महाप्रबंधक यांनी सांगितले. यावेळी सोलापूर पुणे मराठवाडा भागातील मराठवाड्यातील खासदार उपस्थित होते.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!