राजेगावचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा; दवाखान्यात जाणाऱ्या रुग्नांचा जिव धोक्यात

*राजेगावचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा; दवाखान्यात जाणाऱ्या रुग्नांचा जिव धोक्यात!*

 

*मेटे साहेबांची भासतेय उणीव ; ज्योतीताई गावाकडच्या रस्त्यावर एकदातरी येवुन बघाच*

 

 

*सा.बा.विभागाच्या निगरगट्ट अधिकाऱ्याला कार्यालयाच्या बाहेर निघण्यासाठी पायघड्या!*

 

 

 

केज/प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असुन ठिकठिकाणी रस्त्यावर दोन दोन फुट खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन वाहणे चालवणे तर सोडाच परंतु धड पायी देखील चालता येत नाही. तालुक्यातील रस्ते बेवारस स्थितीत पडले आहेत. या रस्त्यावरून शेतकरी बांधव पाईप लाईन करुन रस्ते खोदून टाकले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र सा.बां.विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी याकडे डुंकूनही पाहत नसल्याने या बेवारस रस्त्याला वालीच नसल्याचे दिसुन येत आहे.त्याच प्रमाणे राजेगावकडे जाणारा रस्ता अक्षरशः खड्याने व्यापुन गेला असुन या रस्त्यावरून रुग्नांना दवाखान्यात नेहणे अवघड होऊन बसले आहे. यावरून मेटे साहेबांची नक्कीच उणीव भासत असुन जिल्हाभर फिरणाऱ्या ज्योतीताईंनी एकदा आपल्या राजेंच्या राजेगावकडे यावेच अशी आर्त हाक या भागातील जनता देत आहे .

 

या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील कैक रस्ते खोदून टाकल्यागत झाले असल्याचे पहावयास मिळत असुन या सत्याकडे पाहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचारी यांना वेळ नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उन्हाळ्यात तर या रस्त्याचे कामे केलेच नाहीत. परंतु दोन दोन फुट खोल पडलेल्या खड्ड्यात किमान माती तरी टाकुन खड्डे बुजवणे गरजेचे आहे.मात्र असे होताना काही दिसत नाही. कारण या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या बातम्या अनेक पत्रकार बांधवांनी वर्तमान पत्रातील प्रसिद्ध केल्या होत्या तरी गेंड्याची कातडी पांघरलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या निगरगट्ट अधिकाऱ्याला याच काही देणंघेणं राहीलेले नाही. कारण केज ते नांदूरघाट राष्ट्रीय मार्ग ६४ वरुन ई.जि.मा.१३० सांगवी सारणी ते राजेगाव आणि मांजरा नदी सीमेपर्यंत रस्ता जातो. त्यापैकी केज बीड अर्थात सांगवी सारणी ते राष्ट्रीय मार्ग ६४ पर्यंत या रस्त्याचे काम काही दिवसांपुर्वीच केले आहे. परंतु रा.मा. ६४ येथुन ई.जि.मा.१३० म्हणजेच राजेगाव पाण्याची टाकी ते राजेगाव मांजरानदी जिल्हा हद्दी पर्यंतचा रस्ता हा पाणी देखील चालण्या लायक राहिला नाही. याच रस्त्यावर राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असुन या रस्त्यावरून रोज रुग्णांची येजा असते अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढत या रस्त्यावरून जावे लागत असुन दुचाकीवरून जाणे तर जिकिरीचे झाले आहे. त्यात जर एखादी गरोदर महिलेला प्रसुतीसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहायाचे असेल तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे सा.बां.विभागाच्या अधिकारी यांना अनेक वेळा सांगण्यात आले. मात्र या अधिकाऱ्यांना या रस्त्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. त्यांना जनतेने पायघड्या घातल्या आहेत.तरी या रस्त्याचे काम करत नाहीत. आज जर का स्व.विनायकराव मेटे साहेब असते तर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली नसती. या भागात मेटे साहेबांनी अनेक जनतेच्या हिताची कामे केले होते. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्व.विनायकराव मेटे साहेबांची उणीव भासत आहे. मात्र सर्व जिल्ह्यात जनतेच्या विविध प्रश्नांवर स्व.विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे या काम करत असल्या तरी स्वता:च्या गावचा रस्ता उखडून गेला असुन त्यावर चालणे अवघड झाले आहे. त्यांनी त्यांच्या राजेगाव गावच्या या रस्त्यावर एकदा येवुन हे रास्ता बघायलाच पाहिजे. अशा प्रतिक्रिया या परिसरातील जनतेतून बोलले जात आहे.

 

सोबत फोटो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!