जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी.
केज तालुक्यातील. तरनळी केंद्र लव्हुरी ता .केज शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे व ज्येष्ठ सदस्य श्री वशिष्ठ अर्जुन खामकर तसेच अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन केले व विनम्र अभिवादन करून त्यांची दि.3 जुन 2025 मंगळवार रोजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांचे पुर्ण नाव गोपिनाथराव पांडुरंग मुंडे असुन बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यातील नाथ्रा येथे दि.12 डिसेंबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला.ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते.ते लोकसभा सदस्य म्हणून लोकसभा सभागृहाचे सदस्य असतांनाच केंद्रीय मंत्री होते.त्यांचा दि.3 जुनं 2014 रोजी मृत्यु झाला.अशा या लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज जि.बीड या शाळेत लोकनेते स्वर्गिय मा. गोपिनाथराव मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे,समिती सदस्य, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम,गावकरी, गणेश काशिनाथ माने, राधा आक्का खामकर, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.








Leave a Reply