विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या केज तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवरांना एल.एम.के.२०२५ चा पुरस्कार जाहीर

  • विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या केज तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवरांना एल.एम.के.२०२५ चा पुरस्कार जाहीर

 

२५ मे रोजी पुणे येथे भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात येणार

 

केज/प्रतिनिधी

 

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या केज तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवरांना एल.एम.के.२०२५ चा पुरस्कार जाहीर झाले असून दिनांक

२५ मे २०२५ रोजी पुणे येथे भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, लेक माहेरचा कट्टा आयोजित एल.एम.के.२०२५ चा पुरस्कार मराठवाड्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना नुकतेच जाहीर झाले आहेत. त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यासह केज तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये सामाजिक कार्यकर्ते विशाल ज्ञानोबा पांचाळ रा.डोका, जनहित न्यूजचे संपादक व ए.बी.न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी वसंत रंगनाथ सोनवणे रा. येवता, आदर्श क्रांती मराठी न्यूज चे संपादक व दैनिक महावृत्त चे प्रतिनिधी तात्या गवळी रा. फुलेनगर केज, बीड न्यूज १ चे संपादक तथा प्रिंट मीडियाचे मुबाशीर मुमताजोदिन खतीब रा. रोजा मोहल्ला केज, टीव्ही ९ चे बीड जिल्हा प्रतिनिधी अशोकराव वसंत काळकुटे रा.येळंब घाट, सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श सरपंच गोरख भागोजी भांगे रा. डोका यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दिनांक २५ मे २०२५ रोजी ठीक सकाळी ११-०० वाजता पिंपरी चिंचवड, पुणे येथे पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सन २०१८ साली “लेक माहेरचा कट्टा”या ग्रुपच्या माध्यमातून लेक माहेरच्या कट्ट्याच्या संस्थापिका सौ.सारिकाताई प्रमोद ढाणे यांनी एकमेकींच्या सुख व दुःख हितगुज सखी सोबत वाटून घेऊया एकमेकींना साथ देऊया हे ब्रीदवाक्य घेऊन “लेक माहेरचा कट्टा” हा ग्रुप तयार करून साडेतीन लाख महिलांचे संघटन या ग्रुप द्वारे केले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून संबंध राज्यभर विविध विषयावर “लेक माहेरचा कट्टा” हा ग्रुप काम करत आहे.

संस्थापिका सारिकाताई ढाणे यांनी ग्रुपच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचे संघटन करून त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देणे, महिलांचे सर्वच क्षेत्रातील सक्षमीकरण करणे या उद्देशाने या ग्रुपची स्थापना केली.

आज रोजी त्यांचे रूपांतर एक दोन नव्हे तर तब्बल साडेतीन लाख महिलांचे त्यांनी मोठे संघटन आपल्या कर्तृत्व कौशल्यातून उभे केले आहे.

प्रत्येक वर्षी “लेक माहेरचा कट्टा”आयोजित एल.एम.के. गौरव पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून ग्रुपच्या वतीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय सेवा, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बांधवांसाठी ही विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला-पुरुष मान्यवरांचा “लेक माहेरचा कट्टा” च्या व्यासपीठावर त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो.

दिनांक २५ मे २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यातील मान्यवरांची विविध पुरस्कारासाठी “लेक माहेरचा कट्टा”संस्थापिका सौ.सारिकाताई प्रमोद ढाणे यांनी निवड केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!