*केज नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमातून जागेचा प्रश्न मिटवून गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणार – नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड

*केज नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमातून जागेचा प्रश्न मिटवून गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणार – नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड*

 

*केज शहरातील बेघरांना बेघर होऊ देणार नाही त्यांना न्याय मिळवून देणार- हारुणभाई इनामदार*

 

केज/प्रतिनिधी

 

केज नगरपंचायत आपल्या दारी या उपक्रमातून जागेचा प्रश्न मिटवून गरजवंत नागरिकांना शासन स्तरावर पाठपुरावा करून घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणार असे नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांनी एका कार्यक्रमात बोलताना अभिवाचन दिले.केज शहरातील ज्या नागरिकांना राहण्यास घरे नाहीत अशा नागरिकांना बेघर होऊ देणार नाही त्यांना न्याय मिळवून देणार हारुणभाई इनामदार यांनी बोलताना नागरिकांना ग्वाही दिली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २१ मे २०२५ पासून केज नगरपंचायत आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक सहा मधील बीड रोड वरील वडार वस्ती येथे करण्यात आली.

यापुढे शहरातील क्रांतीनगर, माता रमाई नगर यासह शहरातील विविध प्रभागात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमा अंतर्गत केज शहरातील ज्या गरजवंत नागरिकांना राहण्यासाठी जागा नाही व त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नाही अशा नागरिकांना स्वतःच्या हक्काची जागा मिळवून देणे व काही नागरिक गेले अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत परंतु त्यांना स्वतःच्या नावे नगरपंचायत रेकॉर्डला पीटीआर ला नोंद नाही अशा नागरिकांना नगरपंचायत च्या रेकॉर्डला पीटीआर ला नोंद घेऊन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे असे नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड व हारुणभाई इनामदार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना हारुणभाई इनामदार यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून वडार वस्ती येथे नागरिक वास्तव्यास आहेत परंतु त्यांना शासनाच्या योजनेचा अद्यापही लाभ मिळालेला नाही ते शासनाच्या मूलभूत सुविधा पासून वंचित राहिलेले आहेत म्हणून या भागाचे नगरसेवक व नगराध्यक्षा आणि संपूर्ण नगरपंचायतीची टीम आम्ही कामाला लागलो आहोत आत्ता पर्यंत वडार वस्ती येथे ४० घरकुले देण्यात आली असुन गायरान जागेचा प्रश्न मिटवून त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. त्यांना स्वतःच्या मालकी हाक्काच्या घरासाठी व घरकुला साठी जागा मिळवून देणार आशी ग्वाही हारुणभाई इनामदार यांनी दिली. पुढे बोलताना इनामदार म्हणाले की, क्रांतीनगर, माता रमाई नगर, वडार वस्ती या शहरातील प्रत्येक भागातील ज्या नागरिकांना राहण्यास स्वतःच्या मालकीची घरे नाहीत व बरेचसे नागरिक गेले अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी वास्तव्यास असताना देखील नगरपंचायत च्या रेकॉर्डला पीटीआर वर त्यांच्या जागेची नोंद नाही अशा नागरिकांना आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांच्या जागेची पीटीआर ला नोंद नगरपंचायत च्या रेकॉर्डला घेऊन त्यांना स्वतःच्या मालकीचा पीटीआर देऊन त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना इनामदार म्हणाले की, यापुढे गायरान जमिनीच्या जागेमध्ये जे नागरिक वास्तव्य करीत आहेत त्या ठिकाणी जमिनी कोणालाही खरेदी-विक्री करू देणार नाहीत त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची घरे कोणालाही पाडू देणार नाहीत त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांनी यापुढे घाबरून जायचे कारण नाही जर काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असे ग्वाही इनामदार यांनी बोलताना नागरिकांना दिली आहे.

यावेळी नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड म्हणाल्या की, केज शहरातील अनेक भागांमध्ये हातावर पोट घेऊन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका अनेक नागरिक भागवत आहेत अनेकांना स्वतःची राहण्याकरिता घरे नाहीत अशा गरजवंत नागरिकांसाठी केज नगरपंचायत च्या माध्यमातून व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रांतीनगर, वडार वस्ती, माता रमाई नगर या भागासह शहरातील इतर प्रभागातील नागरिकांच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊन गरजवंत नागरिकांना हक्काचे घर शासन स्तरावर पाठपुरावा करून मिळवून देणार आहोत. केज शहरातील विविध ठिकाणी गेले अनेक वर्षापासून अनेक नागरिक वास्तव्यास आहेत परंतु नगरपंचायतला त्यांच्या राहत असलेल्या घराची नोंद नाही अशा नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही तुमची घरे कोणीही उठविणार नाही जर कोणी तुमची घरे उठविण्यास आले तर त्यांना आम्ही घर उठवू देणार नाहीत केज नगरपंचायत तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका व वरील ठिकाणच्या नागरिकांनी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तात्काळ केज नगरपंचायतला प्रस्ताव दाखल करावा आणि प्रस्ताव दाखल करत असताना काही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले. पुढे बोलताना नगराध्यक्षा बनसोड म्हणाल्या की, आज पर्यंत ज्या नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे व यापुढेही नागरिकांना घरुकुल मिळणार आहे अशा नागरिकांना ज्या ठिकाणी राहत असलेल्या जागेची नोंद नगरपंचायत च्या रेकॉर्डला होणारच आहे परंतु जे नागरिक गेले अनेक वर्षापासून शहरातील विविध भागात वास्तव्यास आहेत त्यांना त्यांच्या राहत्या घरांच्या जागेची नोंद शासनाच्या विविध योजनेतून केज नगरपंचायत च्या रेकॉर्डला नोंद घेऊन सर्व नागरिकांना पीटीआर देणार आहोत असे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी अभिवाचन दिले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, नगरसेवक बाळासाहेब गाढवे, नगरसेवक बालासाहेब जाधव, अशोक गाढवे, शितल लांडगे, तुकाराम ईटकर, राजाभाऊ केकान, विलास केकान, बालू लष्करे, सुलोचना गाढवे, स्वर्णमाला धुमाळ, लक्ष्मीबाई लष्करे, भागीरथीबाई केकान यांच्यासह महिला, नागरिक व केज नगरपंचायतचे नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!