केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद, रमेशराव आडसकर यांच्या पाठीशी अजित दादा ठामपणे उभे आहेत –जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची माहिती

केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद,

रमेशराव आडसकर यांच्या पाठीशी अजित दादा ठामपणे उभे आहेत –जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची माहिती

 

केज/प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सदस्य नोंदणी मोहिमेस केज शहरात नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला.केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी सांगितले की, रमेशराव आडसकर यांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पूर्ण समर्थन आहे.या

कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अंकुशराव इंगळे यांनी आडसकर यांच्या संघर्षमय वाटचालीचे कौतुक करत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.ईश्वर मुंडे यांनी बीड जिल्ह्यात थ्री आर फॅक्टर प्रभावी असून, रमेशराव आडसकर हे भावी आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला.जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी यावेळी खुलासा केला की,अजित दादा पवार यांनी स्वत: आडसकर यांना पक्षात आमंत्रित केले असून त्यांना आमदार करण्याचे आश्वासन दिले आहे.अंबाजोगाई साखर कारखान्यासाठी १५० कोटींच्या निधी देण्यात येणार असुन बजेट मध्ये तरतूद करुन अजित दादा पवार देणार असल्याची घोषणाही यावेळीत्यांनी केली.

रमेशराव आडसकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, प्रत्येकाने किमान दहा सदस्यांची नोंदणी करावी,महिलांचा ही सहभाग वाढवावा असे आवाहन केले.तसेच, मांजरा धरणातून दोन टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून पदाची अपेक्षा न ठेवता जनसेवा करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाला अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे,प्रशांत देशपांडे, मुजफ्फर इनामदार, जलालोद्दीन इनामदार.ऋषीकेश आडसकर,लक्ष्मीकांत लाड,अमर पाटील, अजहर इनामदार, दिलीप गुळभिले, रावसाहेब राऊत आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच जणांची सदस्य नोंदणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!