डॉ.विजय बारीकराव बलाढ्ये कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित
केज प्रतिनिधी.
काव्यमित्र संस्था पुणे यांच्यावतीने अयोजित जागतीक मातृ दिन, छत्रपती संभाजी महाराज जयंती, कर्मवीर भावूराव पाटील जयंती व समाजसेवक तथा विचारवंत संजय संघवई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून समाजात उल्लेखानी कार्य करणार्या विविध क्षेत्रतील व्यक्तीना आदर्श माता, कार्यक्षेत्र उधोजक, कर्मवीर भावुराव पाटील शिक्षणरत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय सेवागौरव पुरस्कार व “जात काही जात नाही…का!” आणि “आठवणींच्या हिंदोळ्यावर” पुस्तकांचे प्रकाशन तारांगण सभागृह पिंपरी चिंचवड सायन्स पार्क या ठिकणी रविवार दिनांक 11 मे २०२५ रोजी सकळी आकरा वाजता देवून सन्मानित करण्यात आले.डॉ विजय बलाढ्ये यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कवी व साहित्यिक डॉ. सुरेश वाकचौरे, डॉ. अशोक साळुंके, श्रीमंत संभाजीराजे जाधवराव, साहित्यिक तरकसे तशेच काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर तसेच उपाध्यक्ष साहित्यिक डॉ. संजय जगताप, सचिव हरिनाथ कांबळे हे उपस्तित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ग्रंथ पूजन करुण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. विजय बारीकराव बलाढ्ये यांनी त्यांचे १ ली ते ७ वी शालेय शिक्षण बीड जिल्हयातील अंबेजोगाई तालुक्यातील देवळा या गावामधून पूर्ण केले. त्यांची घरची परिस्थिती जेमतेम/ हलाखीची असल्यामुळे त्यांनी पुढील ८ वी ते १० वी शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा, ता. केज, जिल्हा बीड येथे वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी त्यांचे पुढील ११ वी ते B. Sc. शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई येथून प्रथम श्रेणी मधून पूर्ण केले. घरची परिस्थिती नसतानांही आपल्या दोन भावांना घेवून डॉ. विजय औरंगाबाद येथे उच्च शिक्षणासाठी गेले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातुन M.Sc. आणि Ph.D. उच्च शिक्षण घेतले. ते Proteomics विषयामध्ये संशोधन करणारे महाराष्ट्रातील प्रथम संशोधक आहेत आणि ते त्यांच्या देवळा गावामधील पाहिले B.Sc., M.Sc. आणि Ph.D. करणारे एकमेव आहेत…डॉ. विजय यांचा स्वभाव अगदी मनमिळावू, प्रामाणिक, सर्वांना सहकार्य करण्याचा, सर्वांना चांगले मार्गदर्शन करणे, बहुजनांतिल विद्यार्त्यानां शिक्षणाचें महत्व पटवून देवून त्यांनां सहकार्य करणे इत्यादी. त्यांनी सर्व जाती धर्मांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरून समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देवून जनजागरणाचे कार्य करत आहेत.
त्यांनी त्यांच्या उच्च शिक्षणानंतर ज्ञानदानाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलिंद महाविद्यालयातून सुरू केले. त्यानंतर अहमदनगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज मध्ये २.५ वर्ष अध्यापणाचे कार्य केले. त्यानंतर सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठामधील जैवमाहितिशात्र विभागामध्ये गेले १५ वर्षापासून अध्यापणाचे कार्य करत आहेत. त्यांचा हा शिक्षणाचा केलेला संघर्ष पाहिला असता आणि त्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि देशप्रेम पाहता काव्यमित्र संस्थेने त्यांनां मानाचा असलेला कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. काव्यमित्र संस्थेने या वेतीरिक्त समाजात उल्लेखानी कार्य करणार्या विविध क्षेत्रतील व्यक्तीना आदर्श माता, कार्यक्षेत्र उधोजक, कर्मवीर भावुराव पाटील शिक्षणरत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय सेवागौरव पुरस्कार देवून गौरविन्यात आले. पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण कार्यकर्म अगदी हर्ष उल्हासात पार पाडला. कव्यमित्र संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा कांबळे व कवयित्री लांडगे यांनी केले.
सोबत फोटो








Leave a Reply