जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत संत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी.
केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिकशाळा तरनळी केंद्र लव्हुरी शाळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अक्षय तृतीया दिवशी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मुळनाव माणिक बेंडोजी इंगळे होते. वडील बंडोजी व आई मंजुळाबाई होते.त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली जि. अमरावती येथे झाला. त्यांनी अंधश्रद्धा,जाती भेदाच्या निर्मुलनासाठी प्रयत्न केले.भजनाचा व किर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.
आत्म संयमनाचे विचार ग्रामगितातून मांडले. मराठी व हिंदी भाषांत काव्यरचना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते ग्रामसुशिक्षित,सुसंस्कृत व्हावे व देवभोळेपणा, अंधश्रद्धा नाहिशी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला.याचा आपण बोध घ्यावा. बाराव्या शतकातील वीर शैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी येथे ११३१ मध्ये अक्षयतृतीयाच्या दिवशी झाला.ते समाज सुधारक होते.त्यांनी हानिकारक प्रथाविरुध्द संघर्ष केला.निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रध्देचा पुरस्कार केला. जातीभेद,स्त्री – पुरुष भेदभाव करु नये. प्राणीमात्रावर दया करा. असे त्यांनी सांगितले. असे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या शाळेतील शिक्षक श्री.बाळासाहेब भिल्लु राठोड सर,श्री. बाबासाहेब राजाराम मैंद सर,श्री.भारत बाबुराव हांगे सर, शिक्षिका श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम,श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे,उपाध्यक्षा सीमा सुधीरमोहिते,राधा आक्का खामकर,पीएम पोषण आहार शक्ती निर्माण योजनेचे कामगार श्री.गणेश काशिनाथ माने,विद्यार्थी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.भारत बाबुराव हांगे सर यांनी केले.शेवटी श्री.बाळासाहेब भिल्लु राठोड सर यांनी आभार मानले.








Leave a Reply