केज तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने बस स्थानकामध्ये पाणपोईचे उद्घाटन

*केज तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने बस स्थानकामध्ये पाणपोईचे उद्घाटन.*

 केज प्रतिनिधी.

केज मधील बस स्थानकावरील प्रवाशाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता माहेश्वरी सभा केज यांनी प्रवाशासाठी थंडगार पाण्याची व्यवस्था केली. हा उपक्रम मागील तीन वर्षापासून चालू आहे. हा उपक्रम व सामाजिक कार्य यापुढेही मोठ्या प्रमाणात चालू राहील असे केज तालुका माहेश्वरी तालुका सभाचे चे अध्यक्ष मनीष जाजू यांनी याप्रसंगी सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक बिक्कड साहेब तसेच प्रमुख पाहुणे वाहतूक निरीक्षक नखाते साहेब, गुंडमॅडम हे होते. मुख्य पाहुण्याच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी माहेश्वरी महासभा बीड जिला उपाध्यक्ष ओमशेठ भुतडा, माहेश्वरी सभाचे ज्येष्ठ प्रेरणास्थान रामेश्वरजी जाजू, मुरलीधर भराडिया, लक्ष्मीनारायण सोनी, श्री किशन जाजू, गोविंद जाजू, आनंद काकानी, विजय भुतडा, सतीश काकाणी, सुरेश सोनी जगदीश जाजू,सुनील तापड़िया,विजय बाहेती,चंद्रकांत भूमकर, गदळे सर ,शिवाजी वागले,डोंगरे साहेब , श्याम पाथरकर,भावेश भाई सह इतर नागरिक उपस्थित होते.

सोबत ,फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!