जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत. “सातवीच्या” विद्यार्थ्यांना निरोप

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत. “सातवीच्या” विद्यार्थ्यांना निरोप.

 

केज प्रतिनिधी ‌

 

 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेतील इ. सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप कार्यक्रमावेळी प्रथम “क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले” यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे, उपाध्यक्षा सीमा सुधीर मोहिते, श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.इ.सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप कार्यक्रमावेळी ज्ञानरुपी शिदोरी चार आपण उपयोग करून या स्पर्धेच्या युगात आपण यश मिळवावे.कधीही वाईट विचार करु नये, वाईट वर्तन करु नये.आपण सतत प्रयत्न करावेत.असे आपल्या प्रास्ताविकात श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज यांनी सांगितले.इ.१ ली ते इ.७ वी या शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांना आलेले अनुभव व शिकायला काय मिळाले? याबाबत इ.७ वी वर्गातील प्रणव नवनाथ कांबळे, श्रध्दा संपत्ती सरवदे, प्रियंका अशोक देटे,सिमा धनराज मोहिते, मयुरी मेघराज मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.श्री बाळासाहेब भिल्लु राठोड सर,श्री.भारत बाबुराव हांगे सर, श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम, श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम, सीमा सुधीर मोहिते यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री भारत बाबुराव हांगे सर यांनी केले.श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!