चाईल्ड प्रायमरी स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात;विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

चाईल्ड प्रायमरी स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात;विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

_________________

केज प्रतिनिधी

केज येथील चाईल्ड प्रायमरी स्कुल चे वार्षिक स्नेह संमेलन १३ एप्रिल रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाले.

स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उदघाटक रंजित आडसकर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हनुमंत सौदागर ,मुख्यअतिथी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर , केंद्रप्रमुख संजय चौरेआदी उपस्थित होते.

उद्घाटक रंजीत द आडसकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्रगती विषयी अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप डॉ हनुमंत सौदागर यांनी करताना म्हणाले स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

 विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सदस्य सर्व पत्रकार मंडळी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे अध्यक्ष शरद गिराम यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजी मुजमुले व प्रकाश काळे यांनी केले

आभार प्रा डॉ नागेश कराळे यांनी मानले.

विद्यार्थ्यांचा बहारदार कार्यक्रमाने जिंकली उपस्थित मान्यवरांची मने _

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सदाबहार कार्यक्रमाची सुरुवात ही प्रथम गणेश भक्ती गीताने झाली व नंतर पोवाडा,नाटिका,जनजागृती करणाऱ्या नाटिका यांवर विशेष भर देऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाण्यांवर नृत्य सादर करत उपस्थित मान्यवरांची पालकांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती शिंदे ,श्रीमती आंधळे, श्रीमती गिरी, श्रीमती पांचाळ, श्रीमती साखरे ,श्रीमती चिंचोलीकर ,भाऊसाहेब शिंदे, सचिन गिराम, भीमराव गिराम ,अनिल चटप, बिरुदेव भंडारे, अनिल चटप, गणेश तपसे, प्रकाश काळे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!