*खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत गाडेओडण्याचा कार्यक्रम संपन्न

*खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत गाडेओडण्याचा कार्यक्रम संपन्न !*

*सारणी (आ)येथे हनुमान जयंती यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न!*

बीड / प्रतिनिधी

केज तालुक्यातील सारणी (आ) येथे काल दि १२ एप्रिल रोजी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या जन्मगावी हनुमान जयंती निमित्त गाडेओडणी व यात्रा महोत्सव खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला आहे.खर तर सारणी (आ) येथील प्रभु रामचंद्र हनुमान महाराजांनी बीड जिल्ह्या साठी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला खरच बजरंगबली लाभले आहेत अशा भावना नागरिकांन मधुन व्यक्त केल्या जात आहेत तरी या विषयी सविस्तर वृत्त असे मौजे सारणी (आ) येथे प्रतिवर्षाप्रमाणे काल गाडेवडणे व यात्रा महोत्सव संपन्न झाला यावेळी समस्त गावकरी मंडळी तसेच बाहेर गावावरुन आलेल्या पाहुण्यांनी हनुमान जयंती निमित्त असलेल्या यात्रा महोत्सवाचा मनोभावे आनंद घेतला आहे तसेच खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी सुध्दा बीड जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या जन्मभूमीला नाही विसरता कुठल्याही प्रकारचा गर्व नाही बाळगता मातीशी नाळ घट्ट ठेवत सारणी (आ) येथे हनुमान जयंती निमित्त यात्रा महोत्सवाचा मनोभावे आनंद घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!