देवगांव येथील रेणूका देवी यात्रेचे शनिवार पासुन आयोजन

देवगांव येथील रेणूका देवी यात्रेचे शनिवार पासुन आयोजन

———————————-

पालखी मिरवणूकीने यात्रेची सांगता

————————————–

केज दि.८(प्रतिनिधी) केज तालुक्यातील देवगांव येथील रेणुका

देवी यात्रेच दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शनिवार दि.१२ एप्रिल पासुन आयोजन करण्यात आले आहे. देवीचा गाढा ओढणे,सोबत पालखी मिरवणुक कार्यक्रम व रविवारी संध्याकाळी (छबिना) पालखी मिरवणूकीने देवीच्या यात्रेची सांगता होणार असल्याने या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येंने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे सह यात्रा कमेटीचे सदस्य आणि गावक-यांनी केली आहे.

केज तालुक्यातील देवगांव

येथे गावच्या उत्तर दिशेला दोन कि.मी.अंतरावर तिर्थक्षेत्र रेणुका माता देवीचे सुंदर मंदिर आहे.

गावक-यांचे व पंचक्रोशितील गावांचे ग्रामदैवत असलेल्या या रेणुका देवीची

यात्रा दरवर्षी चैत्र महीन्यातील

पौर्णीमेच्या दिवशी भरली जाते दर वर्षीप्रमाणे या वर्षीही दि.११ एप्रिल शुक्रवार रोजी गावातील सुहासिनीची पंगत देवी मंदीर परिसरत होणार आहे.

दि.१२ एप्रिल शनिवार रोजी सकाळी हानुमान जयंती उत्सव साजरा करुन सकाळी आठ वाजता रेणुका देवीचा गाढा व सोबत देवीची पालखी देवगांव

येथून वाजत गाजत मंदीराकडे मार्गस्थ होणार आहे.हा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशील मंडळी व महीला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.दुस-या दिवशी रविवारी दुपारी चार वाजता रेणुका देवी मंदिर परिसरात महाप्रसादाची मोठी पंगत होणार व त्याच दिवशी संध्याकाळी गावात देवीचा (छबिना) पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.तरी या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येंने सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे सह यात्रा कमेटीचे सदस्य आणि गावक-यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!