*आझाद पत्रकार गणेश शेवाळे यांना वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र भरातून शुभेच्छांचा वर्षाव*
पाटोदा (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आझाद पत्रकार गणेश शेवाळे यांना वाढदिवसा निमित्त संपूर्ण राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.राजकीय नेते, अभिनेते,सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर,पत्रकार,वकील,व्यापारी तसेच त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.गणेश शेवाळे यांनी पत्रकारितेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निर्भीड आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेमुळे ते महाराष्ट्रातील अनेक लोकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे.त्यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यभरातून शुभेच्छा संदेश,फोन कॉल आणि सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. तसेच, मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी आणि हितचिंतकांनी देखील त्यांना त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासात सातत्याने साथ देण्याचे वचन दिले आसुन
गणेश शेवाळे यांच्या वाढदिवसा निमित्त पाटोदा तालुक्यातील चौका चौकात अनेक मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसा प्रसंगी आझाद पत्रकार गणेश शेवाळे यांनी वाढदिवस प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आणि समाज हितासाठी कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला








Leave a Reply