जिजाऊ रथयात्रा-मराठा जोडो अभियान; केज शहरासह ग्रामीण भागात जोरदार स्वागत. 

जिजाऊ रथयात्रा-मराठा जोडो अभियान; केज शहरासह ग्रामीण भागात जोरदार स्वागत.

 

केज/प्रतिनिधी.

 

जिजाऊ रथयात्रा-मराठा जोडो अभियानाचे कळंब शहरातून गुरूवारी (ता.२७) सकाळी केज तालुक्यात आगमन झाले. जिजाऊ रथयात्रा मांजरा नदी ओलांडून तालुक्यात दाखल होताच ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील शहाजीराजे भोसले यांच्या गढीपासून निघालेल्या जिजाऊ रथयात्रा-मराठाजोडो अभियान संपूर्ण राज्यात भ्रमण करून पुणे शहरातील लाल महालात समारोप होणार आहे. कळंब येथून गुरूवारी सकाळी तालुक्यातील खोंदला, भोपला, बोरगाव, हनुमंतपिंपरी, काळेगावघाट, आरणगाव, मस्साजोग येथून केज शहरात दाखल झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण रमेशराव आडसकर, सौरभ सोनवणे, शिवाजी ठोंबरे नगराध्यक्षा सिता बनसोड, गटनेते हारूण इनामदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या रथयात्रेचे केज शहरासह ग्रामीण भागात जोरदार स्वागत करण्यात आले. दुपारचे भोजन करून रथयात्रा ढाकेफळ, कुंबेफळ, चंदनसावरगाव व होळ मार्गे अंबाजोगाई शहराकडे रवाना झाली. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या रथयात्रेत सौरभ खेडेकर, प्रा. जेष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, प्रदेश उपाध्यक्ष संदीपान जाधव, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, जिजाऊ ब्रिगेडच्या श्रीमती बोराडे,

मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे, मोहन गुंड, पशूपतीनाथ दांगट, दिलीप गुळभिले, योगेश आंबाड, तालुकाध्यक्ष जयदीप देशमुख, पंजाब देशमुख शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर भालेराव, मराठा सेवा संघाचे जिल्हाउपाध्यक्ष युवराज हिरवे, हनुमंत घाडगे, राहुल खोडसे, अरविंद थोरात, धनराज इंगोले, अश्विन टोम्पे यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!