चष्म्याचे दुकान फोडून नगदी १५ हजार रू. सह ३० हजाराचा मुद्देमालाची चोरी;चोरी करणारा सीसीटिव्ही कैद
केज/प्रतिनिधी
केज येथील विष्णू लांडगे व सचिन मस्के या दोघांचे भागीदारीमध्ये कळंब येथील आठवडी बाजार परिसरात असलेले चष्म्याच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेले रोख १५ हजार रु. आणि चष्मे असा एकूण ३० हजार रु किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविले आहेत. शटर उचकटून आत चोरी करताना चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील विष्णू लांडगे व सचिन मस्के या दोघांचे भागीदारीमध्ये कळंब जि धाराशिव येथील आठवडी बाजारात चष्म्याचे दुकान आहे. दिनांक २१ मार्च २०२५ रोजी त्यांनी सायंकाळी ७:३० वा. चे सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद करून केज येथे घरी गेले. त्या नंतर दररोजच्या प्रमाणे ते दि. २२ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानाचे एक शटर सुमारे अर्धा फूट वर उचकटलेले दिसले. म्हणून त्यांनी दुकान उघडू पाहिले असता दिवसभर झालेल्या धांद्याचें पैसे त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले नगदी १५ हजार रु. आणि चष्म्याच्या फ्रेम व साहित्य चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान चोरी करताना चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला असून त्याने अंगात राखाडी रंगाची हुडी,काळी पँट आणि डोळ्यावर चष्मा घातलेले असून तो त्याच्या जवळील टॉर्चच्या प्रकाशात दुकानातील ड्रॉवर आणि सामना शोधीत असताना दिसून येत आहे.
या प्रकरणी विष्णू लांडगे यांनी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ११२/२०२५ भा. न्या. सं. ३०५, ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस निरीक्षक रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे हे तपास करीत आहेत.
_________________








Leave a Reply