केज येथे बुधवार रोजी श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन

केज येथे बुधवार रोजी श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन

केज/प्रतिनिधी

केज शहरातील उमरी रोड येथे बुधवार रोजी श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी केज शहरासह तालुक्यातील नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीहरी चादर व चादर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्री संत बाळूमामा यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत केज शहरातील उमरी रोड येथे श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास तालुक्यासह शहरातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे श्रीहरी चादर व चादर परिवाराच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
वार बुधवार दिनांक २६ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ११-०० वाजता उमरी रोड, चादर यांच्या शेतात श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प. रवी महाराज घाटूळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सौरव सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे, तर. या कार्यक्रमास जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, उपनगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे गटनेते भाऊसाहेब गुंड, नगरसेवक बाळासाहेब गाढवे, नगरसेवक बालाजी जाधव, माजी नगरसेवक अंगद गाढवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास राजाभाऊ डुकरे,शिवाजी चेपट, दादाराव लांडगे,सोनू तांबे,सोनू लोखंडे,महेश शेटे,संतोष पुजारी, संजय रोडे,सिद्धेश्वर गाढवे, राजाभाऊ गाढवे, राम गाढवे, सदाशिव गाढवे,आश्रुबा भुतक,र नानासाहेब रोडे, अमोल रोडे, सुखदेव लांडगे,बबलू रोडे अशोक सौदागर,अमोल बहिरे, बालाजी गायके,तात्या रोडे,मुन्ना शिंदे,अनिल रोडे,अशोक सौदागर, कल्याण दांगट,जितेंद्र रोडे,भारत शिंपले,गणेश रोडे, संदीप गाढवे,अंबादास गायके, गोविंद निंगुळे, पिंटू गाढवे,अप्पा रोडे, प्रवीण गाढवे यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!