ॲग्री स्टॅकचे काम केज तालुक्यातील सीएससी धारकांना १० मार्च पर्यंत पुर्ण करन्याच्या सुचना

ॲग्री स्टॅकचे काम केज तालुक्यातील सीएससी धारकांना १० मार्च पर्यंत पुर्ण करन्याच्या सुचना

 

 

 

केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तालुक्यातील सीएससी सेंटरला दिल्या भेटी

 

 

केज/प्रतिनिधी

 

ॲग्री स्टॅकचे काम केज तालुक्यातील सीएससी धारकांना १० मार्च पर्यंत पुर्ण करन्याच्या सुचना दिल्या आहेत.

केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तालुक्यातील सीएससी सेंटरला भेटी देऊन कामांचा आढावा घेतला.

उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या आदेशानुसार सर्व सेतू चालकांनी आप आपल्या गावातील शेतकरी यांचे ऍग्री स्टॅकचे काम दिनांक १० मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करून घ्यावी. त्यानंतरच आपले सर्व प्रकारचे दाखले certificate निर्गमित केले जातील. ज्या सेतू चालकांनी काम पूर्ण केले नाही त्यांचा आयडी बंद केला जाईल. असे सक्त. आदेश उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांनी दिले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केज तालुक्यातील अनेक ठिकाणी सीएससी सेंटर,सेतू चालकांना भेटी देऊन कामे प्रगतीपथावर करावेत अशा सूचना दिल्या तसेच सज्जातील तलाठी यांनाही प्रत्येक गावात दवंडी देऊन व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचण्याचे काम केले आहे .

केज तालुक्यातील येवता येथे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी भेट दिली असता अनेक शेतकऱ्यांचे काम प्रगतीपथावर चालू आहे परंतु जिओ कंपनीचे नेटवर्क नसल्याकारणाने कामकाज दुपारी २ वाजल्या पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहीले.

सदर जिओ कंपनीचे टॉवर गावात असून नेटवर्क सारखेच चालू बंद होते यामुळे जिओ कंपनीला तक्रारी देऊनही नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल होत नाही. सध्या ॲग्रीस्टॅगचे काम करण्यासाठी सर्व सेतूधारक आपल्या गावातील ऑफिसमध्ये बसलेले असतात परंतु कधी साईटचा प्रॉब्लेम तर कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम या अशा प्रॉब्लेमला वैतागून सदरील सीएससी धारक यांना काम करण्यासाठी उत्साह राहात नाही तरी सर्व सीएससी धारक आपल्या ऑफिसच्या ठिकाणी काम करण्यासाठी सज्ज असतात व बहुतेक ठिकाणचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. तरी जे शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत त्यांनी तात्काळ आपले कार्ड बनवून घ्यावे अन्यथा आपल्या सर्व शासकीय योजना बंद केल्या जाणार आहेत अशा सूचना उपजिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!