छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केला महिला दिन साजरा

छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केला महिला दिन साजरा

 

केज/प्रतिनिधी

 

छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महिला दिन मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला.

अंकुर स्वयंसेवी संस्था केज, यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महिलांनी पुष्पवृष्टी केली व सावीत्रिबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी केज येथील शासकीय कार्यालस भेट देऊन कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये केज पोलीस ठाणे, पंचायत समितीसह इतर कार्यलयास भेटी देवून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून कामकाजा विषयी माहिती जाणवून घेतली.

यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे सत्कार करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैजंता गालफाडे, तसलीम इनामदार,शिलाताई हजारे, रत्नमाला गायकवाड, रंजना गवळी, अर्चना केंद्रे,

वच्छला शिनगारे, अनिता कांबळे सह एकल महिला संघटनेच्या तारामती घोडके, उर्मिला गालफाडे यांच्यासह विविध संघटनेच्या व विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवटी कार्यक्रमाचा समारोप स्नेह भोजनानंतर फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटोशूट करुन करण्यात आला. जागतिक महिला दिन हा महिलांनी विविध उपक्रम घेत मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!