संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यास प्रतिदेहु पावननगरी सज्ज.
” बीजोत्सवास संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प.पुंडलिक महाराज देहुकर यांची विशेष उपस्थिती,बीजेच्या कार्यक्रमाची पावनधाम विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी.
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील औरंगपुर येथील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम याठिकाणी संत तुकाराम महाराज बीज निमित्त गुरूवर्य महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या अध्यक्षते खाली दि. ९ ते १६ मार्च दरम्यान पाच हजार वाचकांचा गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहा चे आयोजन केले आहे.
अंबाजोगाई-कळंब रोडवर असलेले संततुकाराम महाराजांचे मंदिर हे पावनधाम या नावाने सर्वत्र परिचयाचे आहे.महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे यांच्या पुढाकारातून संत तुकाराम महाराजांचे नेत्रदिपक मंदिर साकारल्या गेले आहे.संत तुकोबारायांच्या गाथेतीलविचार किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून जनसामान्या पर्यंत पोहचवण्याचे काम संत तुकोबाराय पावनधामचे संस्थापक अध्यक्ष महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे हे प्रामाणिकपणे करत आहेत.तुकाराम बीजे निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यात प्रामुख्याने किर्तन,पारायण,व्याख्यान, पोवाडे इ.कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बीजेसाठी ह.भ.प.बंडातात्या महाराज कराडकर,ह.भ.प.रोहिदास महाराज हांडे, ह.भ.प.श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर,ह.भ.प. योगी निरंजननाथ महाराज,ह.भ.प.संजय महाराज पाचपोर,ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर,ह.भ.प.माधव महाराज राठी,ह.भ.प. माऊली महाराज पठाडे, ह.भ.प.सचिन महाराज पवार,ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकरयांच्या सह दि.१६ मार्च रोजी महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होईल.
सात दिवस चालणार्या कार्यक्रमास चोवीस तास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या अन्नदानाची सोय अक्षय नंदकिशोर मुंदडा,कल्याणराव भानुदास काकडे यांच्या स्मरणार्थ आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बनसारोळा,श्रीमती तारामती ज्ञानोबा थोरात,वै.शंभू आप्पाराव तपसे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र शंभू तपसे,श्री.व सौ. पल्लवी ज्ञानेश्वर जाधव, विलास धोंडीराम पुदाले,प्रसाद भगवानराव पवार,लाडेगाव, जवळबन,आनंदगाव(सा),ग्रामस्थ यांनी केली आहे.काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महाप्रसादा ची सोय उद्योजक नामदेवराव इंदरराव गोरे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
सात दिवस चालणाऱ्या बीजेच्या कार्यक्रमास सर्व भाविकांना आग्रहाने येण्याचे आवाहन महंत बोराडे महाराजांनी केले आहे.श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम औरंगपूर येथे बीजोत्सवा निमित्त महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल महाराज,अशोक महाराज,तुकाराम पारेकर,गणपत पांचाळ औरंगपूर नगरीचे सर्व ग्रामस्थ तसेच राज्य भरा तील हजारो स्वयंसेवक दिवस-रात्र नियोजनाचे कार्य करत आहेत.








Leave a Reply