कासारी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन
केज,दि ७(प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक विशेष शिबिराचे आयोजन तालुक्यातील कासारी करण्यात आले. आहे.
विशेष शिबिराचे उद्घाटन गुरुवार रोजी उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फावडे एम.जी.,
उद्घाटन समारंभास उत्तमराव डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत डोईफोडे, तसेच क्रांतिवीर आत्माराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय, कासारी या शाळेचे मुख्याध्यापक चोले व्हि.डी. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात त्यांनी युवकांच्या जबाबदारीवर भर देत असे मत व्यक्त केले की, “आजचा युवा हा उद्याचा भारत आहे आणि त्याने डिजिटल साक्षर असणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी डिजिटल साधनांचा योग्य वापर करून समाजहित साधावे. असे मत व्यक्त केले
चोले यांनी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सामाजिक कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांनी यातून समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
या शिबिरात स्वयंसेवकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये ग्रामस्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, डिजिटल साक्षरता कार्यशाळा, स्वच्छता जनजागृती रॅली आणि व्यक्तिमत्व विकास सत्रे यांचा समावेश आहे. डिजिटल साक्षरतेसंदर्भात स्थानिक नागरिकांना मोबाईल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार आणि सुरक्षित इंटरनेट वापर यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. यादव जे. बी. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. क्षीरसागर पी.बी. यांनी केले, तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सरसरे श्याम यांनी मानले.
या विशेष शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बोबडे ए. आर. यांनी परिश्रम घेतले महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष शिबिरामुळे विद्यार्थ्यांना समाजसेवेचा अनुभव मिळणार असून, ते डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करण्यास प्रवृत्त करणार या उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबत फोटो








Leave a Reply