श्रीक्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथील महाशिवरात्री महोत्सवाची सांगता.
केज/प्रतिनिधी
श्रीक्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी येथील विसाव्या शतका तील महान संत विभुती सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी सुरुवात केलेल्या महाशिवरात्री महोत्सवाची सांगता तपोनिधी गुरुवर्य नारायण माऊली उत्तरेश्वर पिंपरीकर यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली.शुक्रवारी झालेल्या काल्याच्या कीर्तनासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या ब्रम्हादिका न कळे खोळ |ते ही आकळ धरीयेली || या अभंगावर विश्लेषण करताना गुरुवर्य नारायण माऊलींनी सांगितले की, ब्रम्हदेवा समान विद्वान आणि चतुर या अखिल विश्वामध्ये कोणीही नाही परंतु त्यांना देखील भगवंत स्वरूप कळले नाही.त्यांना देखील भगवंत एक गाई राखणारा अर्थात लौकीक स्वरुपातच कळाला.आणि म्हणुनच जो काल्याचा प्रसाद सद्वृत्तीच्या गोपाळांना मिळाला तो ब्रह्मदेवाला भगवंताने दिला नाही.अशा प्रकारे जशी भक्ती करावी तसाच देव आपला होतो असा विचार त्यांनी मांडला.कीर्तनाच्या शेवटी उपस्थित ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडुन कीर्तन सेवा संपन्न झाली. सदरील सप्ताहात लेने को हरीनाम देने को अन्नदान या माऊली दादांच्या संकल्पानुसार कीर्तन,प्रवचन आणि अखंड अन्नदान चालू होते त्याच बरोबर यावर्षी सर्व रोग निदान आणि उपचार शिबीर देखील आयोजित करण्यात आले.या प्रसंगी वारकरी सांप्रदायातील ह.भ.प. दिगंबर महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर,ह.भ.प. मनोज देव उमरीकर,ह.भ.प.दशरथ बाबा, ह.भ.प.नवनाथ बाबा,ह.भ.प.लक्ष्मणजी यादव, ह.भ,प.काकडे महाराज,ह.भ.प.श्रीकृष्णमहाराज सिरसट,ह.भ.प.लाला साहेब नाना देवळेकर, ह.भ.प.नारायण बाबा,ह.भ.प.रामजी बाबा, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांसह परिसरा तील उमरी,टाकळी,डोनगाव,राजेगाव,नाव्होली इत्यादी गावांतील नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.








Leave a Reply