संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने तालुका स्तरीय शालेय नृत्य स्पर्धा संपन्न
==============================
शालेय विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने जिंकली.
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी सायंकाळी तालुका स्तरीय नृत्य स्पर्धा येथील पंचायत समितीच्या मैदानात मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या.
याविषयी सविस्तर वृत्त असे की संघर्ष पत्रकार संघ निर्भिड पत्रकारीते बरोबरच शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून मागील तीन वर्षांपासून तालुका स्तरीय नृत्य स्पर्धा आयोजीत करतो याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या संघर्ष सांस्कृतिक मंच 2025 तालुका स्तरीय नृत्य स्पर्धा येथील पंचायत समितीच्या मैदानात संपन्न झाल्या.
या स्पर्धेत तालुक्यातील जवळपास पस्तीस शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर केले. तसेच समाज प्रबोधनात्मक गीते व अभिनय सादर केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले व विद्येची देवता माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. बजरंग बप्पा सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मा.सौ. सिताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा मा. हरुनभाई इनामदार, नगर सेवक बाळासाहेब गाढवे, भाऊसाहेब गुंड, युनुस भाई, ओम रांजनकर, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, प्रविण खोडसे तालुका अध्यक्ष आय कॉंग्रेस,शरीफ शेख, ज्योती सांबरे, विजया कांबळे, सौ. जनाबाई नरहरी काकडे सरपंच साबला, सुनील बापु देशमुख, सरपंच चिंचोली माळी, उमेश यादव सरपंच हादगाव, पत्रकार विजय आरकडे, अनिल ठोंबरे, रणजित घाडगे, यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
या स्पर्धेत सर्व प्रथम येण्याचा मान केज येथील चाटे इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी पटकाविला, पारितोषिक रोख रक्कम 7777 रुपये व सन्मानचिन्ह तर द्वितीय येण्याचा मान स्वामी विवेकानंद विद्यालयात केज यांच्या संघाने पटकावला, पारितोषिक 5555 रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक सुद्धा स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षरा येडे हिने पटकावला, पारितोषिक 3333 रोख रक्कम व सन्मानचिन्ह तर प्रोत्साहन पर बक्षीस श्री संस्कार इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी भार्गवी देशमुख, जि. प. प्राथमिक शाळा कोठी व जि. प. प्राथमिक शाळा ढाकेफळ यांना मिळाले. हे सर्व पारितोषिके केज चे गट शिक्षणाधिकारी मा. लक्ष्मण बेडसकर साहेब व संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या हस्ते विजेत्यांना वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याती श्रुती जाधव यांनी केले तर प्रास्ताविक अनिल गलांडे केले. तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते सत्यम सरदेसाई हे लाभले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गलांडे, सचिव श्रीराम तांदळे, रविंद्र मेटे, ज्योतिराम सावंत, रोहन गलांडे, सचिन साखरे, पांडुरंग कसबे, गणेश सत्वधर, सल्लागार सदस्य अॅड. सुंदरराव तपसे यांनी परिश्रम घेतले.








Leave a Reply