वार्षिक स्नेहसंमेलनातून बाल चिमुकल्यांनी जिंकली गावकऱ्यांची मने

वार्षिक स्नेहसंमेलनातून बाल चिमुकल्यांनी जिंकली गावकऱ्यांची मने

 

भालगाव नं १ येथील जिल्हा परिषद प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

 

केज :- तालुक्यातील भालगाव नं १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आनंदी वातावरणात पार पडले.कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी युसुफ वडगांव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री चोपणे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.धनंजय गुजर, माजी सरपंच युवराज ढोबळे उपस्थित होते .

 

स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवातीस गणपती गीतांनी झाली तर आस्ते कदम,भारुड स्कूल चले हम,नन्ना मुन्ना राही हु ,बेटी हिंदुस्तान की, ईद मुबारक, मेरी प्यारी मा , गोंधळ अशा वेगवेगळ्या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करत बालकलाकारांनी गावकऱ्यांची मने जिंकली.यावेळी गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विलास राऊत, श्याम मोरे,अजित मोरे, सुनील मोरे‌, खंडू विभुते,गणेश हंडीबाग, अंकुश विभुते, विशाल विभुते जलील, शेख वकील यांच्यासह गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहिभाते मॅडम, बावस्कर मॅडम, मुख्याध्यापक अजय काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन फहरत बाजी आणि अमतुलबाजी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!