*रोटरीच्या शैक्षणिक साहित्य उपक्रमाअंतर्गत शाहू विद्यामंदिरला टीव्ही संच भेट*
केज प्रतिनिधी.
केज: रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या पुढाकाराने, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी जयेश पटेल यांच्या मेसर्स पी पी पटेल अँड कंपनी आणि रोटरी फौंडेशन च्या अर्थसह्याने व रोटरी क्लब ऑफ केजच्या उपक्रमांअंतर्गत केज शहरातील राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेला टीव्ही संच भेट देण्यात आला.
शैक्षणिक साहित्यांतर्गत विद्यार्थ्यांना आकलन क्षमता वाढावी व शिक्षण अधिक सुलभ होऊन अभ्यासाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने या टीव्ही संचाची अभ्यासक्रमाची डिझायनिंग करण्यात आली आहे. डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून गरजू शाळांना आपल्या अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासाठी रोटरी ने हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या पाच वर्षात प्रतिवर्षी जिल्ह्यातील शंभर शाळांना अशा डिजिटल रुम तयार करण्यासाठी रोटरी मदत करणार आहे.
केज शहरातील राजर्षी शाहू विद्यामंदिर या शाळेत पहिल्या उपक्रमात अंतर्गत हा टीव्हीसंच भेट देऊन त्यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम इन्स्टॉल करण्यात आला आहे. यावेळी सोलापूर रोटरीचे रो अतुल चव्हाण, रो महेश साळुंके, रो उदय शिंदे , केज रोटरीचे अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद, केज रोटरीचे हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, सत्यवान राऊत, संस्थेचे अध्यक्ष ऍड राजेसाहेब देशमुख, सचिव जी बी गदळे, मुख्याध्यापिका सौ चाटे-गदळे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी या महत्त्वाच्या उपक्रमाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या मे. पी पी फौंडेशन चे केज रोटरीने विशेष आभार मानले.








Leave a Reply