जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालय, केज येथे विद्यार्थ्यांसाठी* “*फायनान्शिअल ट्रेनिंगचे*” *यशस्वी आयोजन.

*जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालय, केज येथे विद्यार्थ्यांसाठी* “*फायनान्शिअल ट्रेनिंगचे*” *यशस्वी आयोजन.*

*विद्यार्थ्यांनी केंद्रशासनाच्या सेबी अंतर्गत राबविलेल्या कार्यक्रमास दिला उत्स्फूर्त प्रतिसाद*

प्रतिनिधी (केज): दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालय, केज या ठिकाणी केंद्रशासनाच्या भारतीय प्रतिभूती आणि विनिमय ( SEBI) बोर्ड अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक नियोजन व विनिमय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव मा. हारुण इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिट शांतता बाळगून श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गणेश चौधरी सर ( सेबी – सिक्युरिटीज मार्केट ट्रेनर) लाभले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे फायदे, तरतुदी, आर्थिक बाबींचा विनिमय आणि आर्थिक गुंतवणूक करण्याच्या पद्धती यांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळात आणि या स्पर्धेच्या युगात आर्थिक धोरणांवर काम करून स्वतः आर्थिक बाजूने कसे भक्कम उभे रहावे यावर त्यांनी भर दिला. आर्थिक गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, शासकीय तरतुदींचा अभ्यास करून त्यावर कसे काम करावे जेणेकरून आपण आर्थिक बाजूने कसे प्रबळ होऊ, याबद्दल त्यांनी आपल्या शिबिरात मार्गदर्शन केले.
या शिबिरास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. हारूण इनामदार, प्रमुख अतिथी मा.सीताताई बनसोड ( नगराध्यक्षा – न. पं. केज),संस्थेचे सहसचिव मा.यासीन हारूण इनामदार उपस्थित होते.जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य मा.दत्तात्रय हांडीबाग सर,जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी तथा बंसल क्लासेस केज व कळंब शाखेचे सहसंचालक मा.गोविंद ठोंबरे सर, जीवन शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.रमाकांत ढाकणे सर यांनी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लावली.
बी.एस.सी.विभाग प्रमुख मा.नितीन साखरे सर, मा.बाळासाहेब बोधवड सर, मा.दत्ता ठोंबरे सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन व्यवस्थितरित्या पार पाडण्यास परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार नितीन साखरे सर यांनी केले.
जीवन शिक्षण विज्ञान महाविद्यालय, केजची आदर्श विद्यार्थिनी प्रेरणा थोरात हिचा मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार देखील करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!