एन एम एम एस परीक्षेत रामराव पाटील शाळेचे घवघवीत यश

  1. एन एम एम एस परीक्षेत रामराव पाटील शाळेचे घवघवीत यश

 

 

 

केज प्रतिनिधी

केज येथील

रामराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी

राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी (एन. एम. एम. एस) या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेकडून उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर , केंद्रप्रमुख श्री अंकुशे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांचा संयुक्त सत्कार करण्यात आला.

रामराव पाटील माध्यमिक शाळेमध्ये दरवर्षी एन एम एस परीक्षेमध्ये विद्यार्थी प्रविष्ट केले जातात. यावर्षी 30 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 15 विद्यार्थी एन. एम. एम. एस. परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यानिमित्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यासोबत त्यांच्या पालकांचा सत्कार शाळेमध्ये आयोजित केलेला होता. यावेळी बोलताना डॉ सौदागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ग्रामीण भागातील विद्यार्थी असे यश संपादन करू शकतात यासाठी पालकांनी शाळेसोबत एकत्र येऊन दिशादर्शन करावे असे सुचवले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरे यांनी विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अध्यापक सतीश कळेकर ,शेख इर्शाद, श्री देवकते ,श्री पोटभरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डॉ. गिरी यांनी केले तर आभार सुधीर नाईकनवरे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी पालक, सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!