सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी केज तहसीलदार यांना शेतकऱ्यांचे निवेदन.
केज/प्रतिनिधी
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी दि.१०फेब्रुवारी २०२५ सोमवार रोजी तहसीलदार यांना केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की,सोयाबीन खरेदी विक्रीची तारीख सरकार ने ६ फेब्रुवारी दिली होती. परंतु केजचे खरेदी विक्री संघ जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू केल्यामुळे शेतकरी ऑनलाईन नोंदणी करून सुद्धा शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होऊ शकली नाही.नाफेड कडून शेतकऱ्यांना मेसेज आले होते की,सोयाबीन विक्री साठी सोयाबीन खरेदी विक्री संघात घेऊन या पण शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होऊ शकली नाही,शेतकरी १० दिवसांपासून गाड्या भाड्याने प्रती १५०० रुपये किराया देऊन उभे आहेत,पण सरकार ने दिलेल्या तारखेत सोयाबीन विक्री न झाल्या मुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.केज खरेदी विक्री संघ उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होऊ शकली नाही. तरी आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता केज तहसीलदार यांना निवेदन देऊन सरकारला विनंती केली आहे. सोयाबीन खरेदी विक्रीची तारीख वाढवुन दयावी,व ऑनलाईन नोंदणी केलेल्या व खरेदी विक्री संघात रांगेत उभ्या असलेल्या व मॕसेज आलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करावी व सोयाबीन खरेदीची तारीख वाढवुन द्यावी अशी विनंती सरकारला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी केज तालुक्यातील शेतकरी विश्वास राऊत,महादेव चाटे,रमेश कदम, महेश कदम,सुग्रीव जगताप,जयदेव तांदळे, नवनाथ राऊत,गोविंद सोळंके,रूषीकेश कदम, नंदकुमार कदम,लक्ष्मण राऊत,धीरज तांदळे सुरज तांदळे,राहीबाई तांदळे,जिजाबाई जगताप, कांताबाई वाघमारे,कैलास पवार,सूंदर लाड, अक्षय राऊत, सोमनाथ राऊत,संदीपान घूले इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तरी सरकारने सोयाबीन खरेदी ची तारीख वाढवुन दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.असा कडक इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.








Leave a Reply