जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत “रामानुजन” यांची माहिती दिली

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत “रामानुजन” यांची माहिती दिली.

केज प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज शाळेत दि.10 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी “रामानुजन” यांच्या प्रतिमेस श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले.”रामानुजन ” यांचा जन्म दि.22 डिसेंबर 1887 रोजी भारतातील तामिळनाडूच्या कोइम्बतुर मधील इरोड गावात झाला. वडील श्रीनिवास अय्यंगर व आईचे नाव कोमल हे होते.त्यांना गणित व इंग्रजी विषयाची जास्त प्रमाणात आवड होती.ते इ.7 वी वर्गात असताना पदवीच्या मुलांना गणित शिकवत असत.अशी माहिती देण्यात आली.या शाळेतील शिक्षक श्री भारत बाबुराव हांगे सर, श्री बाळासाहेब भिल्लु राठोड सर, आदर्श शिक्षिका श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम, श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम यांनी सखोल माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!