बालमित्रानों मोबाईल बघण्यापेक्षा मैदानावर जा व मनसोक्त खेळा — प्रियंका इंगळे

*बालमित्रानों मोबाईल बघण्यापेक्षा मैदानावर जा व मनसोक्त खेळा — प्रियंका इंगळे*

 

केज/प्रतिनिधी —

आज दिनांक ८/२/२०२५ शनिवार रोजी भारतीय महिला खो-खो संघाची विश्वचषक विजेती कर्णधार कु.प्रियंका इंगळे,यांनी आवाड एज्युकेशनल अकॅडमी केज येथे सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व छोट्याशा गावातून येवून भारतीय महिला खो – खो संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या कु.प्रियांका यांनी या प्रसंगी बोलताना जिद्द,चिकाटी व सातत्य या त्रिसूत्री चा वापर करून यशाला गवसणी घालत येते असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी मोबाईल बघण्यापेक्षा मैदानावर मनसोक्त खेळावे,खेळामुळे आरोग्य सुधारते व एकाग्रता वाढण्यास मदत होते असे ही सांगितले.विद्यार्थ्यांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी या वेळी बोलताना केली.तसेच पालकांनी सुद्धा आपल्या मुलाची क्रिडा क्षेत्रात रूची बघून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना त्यांच्या वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सांगायला त्या विसरल्या नाहीत.

एका विश्वविजेत्या कर्णधाराला ऐेकण्याचा व पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद देवून गेला.कु.प्रियंका इंगळे यांचे मनोगत ऐकून विद्यार्थी व पालक भारावून गेले होते.

या सत्कार सोहळ्यास आवाड एज्युकेशनल ॲकॅडमी चे संचालक डॉ.विठ्ठल आवाड,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!