जिल्हा प प्रा शाळा आनेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

जिल्हा प प्रा शाळा आनेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

 

 

*स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव* *मिळतो—सुनील केंद्रे*

 

केज / प्रतिनिधी.

केज तालुक्यातील आनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.

 

विद्यार्थ्यासोबतच पालकांनीही सहभागी होऊन विविध गुणदर्शनांना वाव दिला. यामध्ये पालकांनी विविध नाटके सादर केली. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण लाखे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुनील केंद्रे होळ,केजचे केंद्रप्रमुख श्री.चौरे युसुफ वडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बोराडे, डॉ हनुमंत सौदागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी केंद्रे म्हणाले स्नेहसंमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो यामधून त्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांची तसेच समस्त गावकऱ्यांची उपस्थिती होती. पालकांनी सादर केलेल्या नाटकातून प्रथम क्रमांक- जैसी करनी वैसी भरणी द्वितीय क्रमांक- अकरा रुपये ठेवा अंगात आला देवा तृतीय क्रमांक -काळ्या आईची व्यथा या नाटकाना मिळाले. पालकांनी सादर केलेल्या नाटकाचे परीक्षण श्री. लाखे श्री. मुळे श्री. गुजर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु ज्ञानेश्वरी गवळी व श्रद्धा हंडीबाग यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पौळ श्री. मांगडे व श्रीम. पूनम हंडीबाग यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!