साने गुरुजी विद्यालयाचे स्नेह संम्मेलन उत्साहात संपन्न.

साने गुरुजी विद्यालयाचे स्नेह संम्मेलन उत्साहात संपन्न.

केज/प्रतिनिधी

 

साने गुरुजी निवासी प्रा.मा.उच्च माध्यमिक विद्यालय केज व नरेंद्रजी मोदी परिचारिकाप्रशिक्षण संस्था आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन आयोजित करण्यात आले होते.या स्नेह संम्मेलनाचे उद्घाटन श्री.डी.बी.क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,या वार्षिक स्नेह सम्मेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो शिक्षणा बरोबरच आपल्या आवडता छंद जोपासला जातो साने गुरुजीनिवासी विद्यालय शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या सतत कार्यरत असते यानिवासी शाळेने अल्पावधीतच जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करुन क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली बेसबॉल व सॉफ्टबॉल या खेळात आत्तापर्यंत पन्नासच्या वर राष्ट्रीय खेळाडू निर्माण करुन बीड जिल्ह्याची मान उंचावली असुन कमी शिकलेले असुनही क्रिकेटचा देव म्हणून भारतरत्न मिळविलेले सचिन तेंडुलकर दोनदा दहावी नापास आहे.तर एकच दिवसाची शाळा शिकलेल्या स्वर्गीय लता मंगेशकर यांनी सुद्धा भारतरत्न प्राप्त केले या वरुन आपल्या छंदाला पॕशन बनवून जिद्द व चिकाटीने आपली कला जोपासली तर काही ही साध्य करता येते त्या खेळ असो किंवा असे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे प्रत्येक शाळा, महाविद्यालय हे दरवर्षी वार्षिक स्नेह सम्मेलनाचे आयोजन करुन होतकरू विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्या साठी व्यासपीठ निर्माण करुन देते असे सांगितले. या वार्षिकस्नेहसम्मेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत,कोळी गीत,बंजारा गीत,शेतकरी गीत, कव्वाली,आदिवासी गीत, लावणी,भारुड,तसेच हगणदारीमुक्त गांव या नाटकाने उपस्थित पालकांचे मने जिंकली या स्नेह सम्मेलनाच्या अध्यक्ष स्थानीबीडजिल्हाऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.उद्धवराव अण्णा कराड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण बारगजे,निरिक्षक इतर मागास बहुजन कार्यालय,बीड,श्री.अमन सिरसाट पोलीसनिरीक्षक, वडवणी,श्री.पी.एम.ठोंबरेशाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक केज, श्री.संतोष गालफाडे, अध्यक्ष सक्रिय पत्रकार संघकेज,श्री.राजेशकापसे,अरुण चाटे सरपंच तांबवा,पत्रकार गौतम बचुटे तसेच बीड जिल्ह्या तील आश्रम शाळा मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.कविता कराड-गित्ते मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!