स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्राथमिक विभाग) केजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्राथमिक विभाग) केजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

( विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली)

सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थी कलाकार घडतात—डॉ हनुमंत सौदागर

केज दि २९(प्रतिनिधी)

केज शहरातील नामांकित शाळा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्रा) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून केज गटसधान केंद्राचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर म्हणाले मराठवाडा ही कलाकारांची भूमी आहे स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो यामधून चांगले कलाकार घडतात असे मत व्यक्त केले
श्री चाटे म्हणाले बालकलाकारांना पालक चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करतात असे मत व्यक्त केले.

प्रमुख उपस्थिती जीवन विकास शिक्षण मंडळ केजचे अध्यक्ष श्री. अंकुशराव इंगळे , फजिलोद्दीन काझी, नारायण अंधारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलाताई इंगळे, श्रीमती मुळे , गणेश कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी
छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा, मराठी, हिंदी, लोकगीत,गोंधळ, भारुड अशा विविध गीतावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. शितोळे , सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनात झाले. सूत्रसंचलन श्री. एम. गिरी यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!