आडस येथील कला महाविद्यालयास नॅक मूल्यांकन बी ग्रेड प्राप्त 

केज (प्रतिनिधी)

तालुक्यातील आडस येथील कला महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले.तपासणीनंतर नॅक समितीकडून कला महाविद्यालयास बी ग्रेड प्राप्त झाला.याबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १४ ) व दि १५ डिसेंबर रोजी नॅक मूल्यांकन तपासणी झाली.

नॅक मूल्यांकन समितीचे अध्यक्षा केंद्रीय विद्यापीठ कर्नाटक येथील प्रो.करमला पदमश्री, समिती सदस्य श्री शंकराचार्य विद्यापीठ केरळ येथील प्रो फ्रँसिस ए पी अरकल,

समिती सदस्य सोहनलाल दव शासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र पदव्युत्तर महाविद्यालय हरियाणा चे प्राचार्य डॉ विवेक कोहली

यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली.

महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनासाठी चे सर्व निकष पूर्ण केले. सर्व तपासणीनंतर बी ग्रेड प्राप्त झाल्याचे पत्र महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

कला महाविद्यालय नियोजनासाठी

श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेख ए आर, बाबुराव आडसकर महाविद्यालयाचे

प्राचार्य डॉ फावडे एम जी,

श्री राजेश देशमुख,श्री लगस्कर ,श्री गव्हाणे,

महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ ज्ञानेश्वर पांचाळ यांच्यासह बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, कला महाविद्यालय आडस येथील प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!