*महिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या केज तालुका अध्यक्षपदी तात्या गवळी यांची* =======================

 

केज/प्रतिनिधी

 

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर , कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तात्या लहु गवळी यांची केज तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, बीड जिल्हा कार्यध्यक्ष नितीन ढाकणे, उपाध्यक्ष अँड. हरिभाऊ घाईतिडक, बीड जिल्हामुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे, सरचिटणीस मुबाशीर खतीब, बीड जिल्हउपाध्यक्ष किसन दादा कदम, बीड जिल्हाप्रचार संघाटक अमोल थोरात, केज तालुका अध्यक्ष रमेश गुळभिले यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुकाध्यक्षपदी तात्या लहु गवळी यांची निवड करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना तात्या गवळी सांगितले की, माहिती अधिकार फेरडेशनचे संपूर्ण नियम अटी व आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करून या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

यावेळी पत्रकार मुबाशीर खतीब, जेष्ठ नेते किसन दादा कदम, बीड युवामतचे संपादक आशोक नागरगोजे, पत्रकार साजेद इनामदार, अमोल थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर निवडीमुळे मित्र परिवारांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!