*लोकजागृतीतून स्वच्छता मोहीम यशस्वी होईल* *—–डॉ हनुमंत सौदागर* *कृतिशील कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर यांच्या पुढाकारातून सारणी गाव हागणदारीमुक्त*

 

 

केज दि १७(प्रतिनिधी)

तालुक्यातील सारणी गावी मुख्य रस्त्यावर गावातील महिला पुरुष उघड्यावर शौचालयासाठी येत होते. आनंदगाव हागणदारी मुक्तीची स्वच्छता मोहीम यशस्वी करणारे ग्रामगीतेचे अभ्यासक, कृतिशील कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर यांनी सारणी गावाला हागणदारी मुक्त करण्यासाठी

पुढाकार घेतला.अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांच्या सहकार्यातून हागणदारी मुक्त केले आहे. हागणदारी मुक्त गाव हा फलक लावण्यात आला.

हागणदारी मुक्तीची स्वच्छता मोहीम हाती घेऊन

शाळेतून जनजागृती फेरी काढून नागरिकांना प्रबोधन केले. प्रत्यक्ष हागणदारीच्या ठिकाणी रोज पहाटे जाऊन रांगोळी काढणे, उघड्यावर येणाऱ्यांना फुले देऊन नागरिकांचे स्वागत करणे. प्रत्यक्ष हाती खराटा घेऊन हागणदारीतील घाण साफसफाई केली. तेथे दीपोत्सव साजरा केला. नागरिकांना समजावून सांगणे असे वेगवेगळे प्रयोग करून प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून नागरिकांना नम्रपणे वंदन केले मोहीम यशस्वीतेसाठी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, पिडीएस विद्यालयातील विद्यार्थी,ग्रामपंचायत यांनी सहभाग नोंदवला.सर्वांच्या सहकार्यातून शौचालयाला उघड्यावर जाणाऱ्या महिला आणि पुरुषांनी आता शौचालयाचा वापर सुरू केला आहे. गाव हागणदारीमुक्त झाले आहे. तालुक्यात हागणदारीमुक्तीचा लढा ते अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकचळवळ यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वांनी सहकार्य केले.

ग्रामपंचायतने स्वच्छतेसाठी नागरिकांना सजग केले आहे.

आम्ही उघड्यावर जाणार नाही असा फलक गावात लावण्यात आला. यापुढे कोणीही उघड्यावर जाणार नाही असे अभिवचन गावकऱ्यांनी दिले.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!