*रिपाइंचे बंडू मस्के यांचा आ. नमिता मुंदडा यांना जाहीर पाठींबा*

 

 

 

केज :-

 

युवक रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बंडू मस्के यांच्यासह कार्यकर्त्यांनी केज विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

केज विधानसभा मतदार संघाच्या भाजप तथा महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ केज शहरातील भीम नगर भागात शुक्रवारी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष बंडू मस्के यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत बंडू मस्के व कार्यकर्त्यांनी आपले मनोगते व्यक्त करीत उमेदवार आ. नमिता अक्षय मुंदडा यांना जाहीर पाठिंबा दिला व त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू व विजयश्री खेचून आणू अशी ग्वाही देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिली यामुळे नमिता मुंदडा यांची शहरातील ताकत वाढली असून दलित समाजाच्या मतांचा बाजार मांडणाऱ्या नेत्यांना या पाठिंब्यामुळे चांगलीच चपराक बसली आहे

 

बैठकीस महादेव सूर्यवंशी , विजय केंद्रे, सुधाकर लांब, प्रवीण देशपांडे, भीष्म हजारे, संजय मस्के, प्रेमजीत हजारे, प्रमोद मस्के यांच्यासह तरुण, महिला मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!