जेष्ठ पञकार सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची ३४ वर्षे १६ जुन रोजी पुर्ण

जेष्ठ पञकार सतीश केजकर यांच्या वयाची साठी तर पत्रकारीतेची ३४ वर्षे १६ जुन रोजी पुर्ण

 

केज/प्रतिनिधी

 

केज येथील ज्येष्ठ पत्रकार श्री सतीश व्यंकटराव केजकर यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली. तर पत्रकारितेत ३४ वर्षाचा पण प्रवास त्यांनी पूर्ण केला. वयाचे अर्धे वर्ष हे पत्रकारितेत घालवले त्यांनी अनेक चढउतार या पत्रकारितेत बघितले १९९२ ला त्यांनी पत्रकार तिची सुरुवात केली. तो काळ आणि आजचा काळ यात जमीन आसमांचा फरक आहे कारण त्यावेळेस प्रत्यक्ष बातमी लिहायला लागायची व घटनास्थळी जाऊन माहिती घ्यायची. ती बातमी लिहून ते पाकीट कंडक्टर जवळ द्यायचे व बातमी छापून यायची वाट बघायची. त्यांनी अनेक पत्रकार घडविले.त्यांनी विवेक संधु,अजिंठा, गावकरी, चंपावती पत्र, सर्वसाक्षी,देवगिरी तरुण भारत, सोलापूर तरुण भारत, आशा अनेक वर्तमानपत्रातून काम करून त्यांनी पत्रकारितेचा प्रवास आज पर्यंत जपला आहे.आज ते स्वतःचे साप्ताहिक केज परिसर १४ वर्षापासून सांभाळतात व केज तालुक्यात प्रथम अधिस्वीकृती मिळवण्याचा मान त्यांनाच मिळाला पण कधीही त्याचा त्यांनी गर्व केला नाही आजही त्यांच्या विनम्र स्वभाव व हसतमुख चेहरा पाहून त्यांच्याकडून आणि गोष्टी शिकण्यासारखे आहेत १९९५ ला युवा पत्रकार संघटना स्थापन केली त्यानंतर त्यांनी जनतेसाठी व शेतकरी असो शैक्षणिक असो अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आज वयाची साठ वर्ष पूर्ण झाली असे त्यांच्याकडे बघून वाटत नाही. पत्रकारितेतील अनेक किस्से ते सांगताना म्हणतात की पाकीट पासून एक रुपयाच्या कॉइंडिंग बॉक्स फॅक्स टेलिफोन ई-मेल ते आजच्या अँड्रॉइड फोन पर्यंत त्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांच्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्या उरोळीत आयुष्याला ती लाभो व पत्रकारितेची सेवा अजूनही त्यांच्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!