तालुकास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत जि.प.प्रा.शा.आनंदगावचे
घवघवीत यश
केज दि ३(प्रतिनिधी )
केज येथे जि.प.बीड शिक्षण विभाग अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय वैयक्तिक क्रीडा प्रकारात जि.प.प्रा.शा.आनंदगांव ,केंद्र पैठण येथील विद्यार्थीनीं अनुष्का भोगजकर धावणे या क्रीडा प्रकारात तालुक्यातुन प्रथम,सांघिक क्रीडा प्रकारात लंगडी मुले लहान गटातुन याच शाळेतील विद्यार्थ्यांचा संघ केज तालुक्यातुन प्रथम आला आहे.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत समुह नृत्य स्पर्धेत लहान गट मुले जि.प.प्रा.शा.आनंदगांव तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी सुनिल केंद्रे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती पठाण ,केंद्र प्रमुख अण्णासाहेब जाधव , केंद्रीय मुख्याध्यापक गोविंद मुळे
मुख्याध्यापिका वृषाली आचार्य,सहशिक्षिका एम यु देशमुख,परदेशी एन,ए, आयवळे कुणाल, सरपंच अंजना गायकवाड
,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गायकवाड , माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष डॉ हनुमंत सौदागर , यांच्यासह ग्रा प सदस्य यासह
या शाळेतील विद्यार्थ्यांना जि.प.प्रा.शा.आनंदगावच्या मुख्याध्यापिका वृषाली आचार्य,मंगल देशमुख,निता परदेशी,कुणाल आयवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन करून ग्रामीण भागातून शाळेला घवघवीत यश प्राप्त करून दिले याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सोबत फोटो








Leave a Reply