टप्पा तीन व चार मधून शिक्षक कॉलनी परिसरातील कामे मार्गी लावणार-डॉ. हारुणभाई इनामदार

टप्पा तीन व चार मधून शिक्षक कॉलनी परिसरातील कामे मार्गी लावणार-डॉ. हारुणभाई इनामदार

 

शिक्षक कॉलनी येथे उद्यानासाठी १कोटीचा निधी मंजूर-नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड

 

केज/प्रतिनिधी

 

केज शहरातील बीड रोडवर शिक्षक काॅलनी जवळ जीवन शिक्षण विद्यालयाच्या समोर लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाचा चौक स्थापन करण्यात आला असून केज नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेमध्ये या चौकाला एक मताने मंजुरी देण्यात आली. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड, नगरसेवक अझरभाई इनामदार यांचा शिक्षक कॉलनी येथील नागरिकांनी भव्य नागरिक सत्काराचे आयोजन केले होते.

याप्रसंगी बोलताना डॉ.हारुणभाई इनामदार म्हणाले की,केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील प्रलंबित प्रश्न, रस्ते, नाल्या आणि विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील पुढे बोलताना इनामदार म्हणाले की, शिक्षक कॉलनी परिसरातील विविध विकास कामे ही टप्पा तीन व चार मधून लवकरच करण्यात येणार आहेत व तसा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे बरिच कामे ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. या भागातील विकास कामासाठी आम्ही तत्पर आहोत विकास कामे करण्यासाठी कसल्याच प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही असे केज नगरपंचायतचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते हारुणभाई इनामदार आश्वासित केले.

शिक्षक कॉलनी,उमरी रोड या परिसरामध्ये एक भव्य दिव्य असे उद्यान उभारण्यात येत आहे त्यासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. उद्यान्याचे काम एका महिन्यात सुरू होणार असल्याची घोषणा नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांनी यावेळी केली.

शिक्षक कॉलनी भागातील आंबेजोगाई-बीड हायवेवर ‘स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक’ स्थापन करण्यात आला आहे. पत्रकार प्रकाश मुंडे व या भागातील युवक यांच्या पुढाकारातून आणि नगरपंचायतच्या सर्वानुमते ठरावाद्वारे या चौकास मंजुरी मिळाल्याबद्दल, शिक्षक कॉलनीतील नागरिकांच्या वतीने कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

विकासासाठी आम्ही कटिबद्ध : मान्यवरांचे प्रतिपादन

यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.हारुणभाई इनामदार यांनी कॉलनीतील रस्ते , नाली, लाईट डीपी व इतर नागरी सुविधांच्या पूर्ततेचे आश्वासन दिले. नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “शिक्षक कॉलनी भागातील समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.” तर नगरसेवक आझहरभाई इनामदार यांनीही या भागाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.या सोहळा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब केदार सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मुकुंद मुले सर यांनी मानले. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार प्रकाश मुंडे, खय्युम शेख, अमोल धस, अमोल घुले, रवी घुले, अमोल मुंडे, पप्पू गायकवाड, रणजित घुले आणि प्रविण साबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यांची लाभली उपस्थिती:

या कार्यक्रमास एम.डी. घुले सर, चंदू चौरे, सोनू धस, महादेव जाधवर, नागरगोजे साहेब, तांबडे सर, रोहित मुंडे, राजेश गवळी सर, बाबा मुंडे सर, गायकवाड ताई यांच्यासह शिक्षक कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने

उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!