रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

 

केज प्रतिनिधी.

शहरातील रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल दि. दि १४ डिसेंबर ते १७ तीन दिवशीय सहल भीमाशंकर- लेण्याद्री- ओझर- शिवनेरी- नाशिक त्रिंबकेश्वर- भंडारदरा -कळसुबाई- शिर्डी -शनिशिंगणापूर- मोहटा देवी आदी ठिकाणी

भेटी देऊन संपूर्ण झाली यादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध स्थळाबद्दल भौगोलिक ऐतिहासिक माहिती देऊन त्यांच्या अभ्यासक्रमा इतर उपक्रमात भर घातली.

सहलीमध्ये मुलांनी ऐतिहासिक,भौगोलिक, नौकानयन, धार्मिक- सांस्कृतिक स्थळी निसर्गाच्या सानिध्यामध्ये

विद्यार्थ्यांना अनुभूती मिळाली विद्यार्थ्यांनी स्थानिक खाद्य पदार्थांचा येथेच्छ लाभ घेतला. या सहलीसाठी राज्य परिवहन मंडळाने लालपरी बसमधून प्रवास झाला एसटी चालक श्री थोरात यांनी सुरक्षित पद्धतीने गाडी चालवली.

सहलीच्या नियोजनामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री खोसे यांनी मोलाचा मार्गदर्शन केले. सहल यशस्वी करण्यासाठी श्री गोरे श्री देशमुख,श्री देवकते, श्री टोपे , श्री कळेकर ,श्री नाईकनवरे ,श्री शिंपले यांनी परिश्रम घेतले.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!