केज तालुक्यातील शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करुन घ्यावी
यासाठी सीएससी केंद्र व ग्रामपंचायत स्तरावर सुविधा उपलब्ध – तहसीलदार राकेश गिड्डे
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात अद्याप इ केवायसी न केल्याने अनुदान प्राप्त झाले नाही अशा शेतकऱ्यांची एकूण संख्या 8548 इतकी आहे तसेच सदर शेतकऱ्यांचे एकूण 9.13 कोटी इतके अनुदान वाटप प्रलंबित आहे.त्यामुळे सर्व संबंधित प्रलंबित शेतकरी यांची इ केवायसी करून घेण्या साठी कॅम्प सर्व सीएससी केंद्रावर आणि ग्राम पंचायत स्तरावर आज पासून आयोजित केला आहे.इ केवायसी पोर्टल हे सकाळी आणि सायंकाळी व्यवस्थित चालत असल्याने कृपया सकाळी लवकर आणि संध्याकाळी इ केवायसी करून घेण्यास सर्व शेतकऱ्यांना कळवावे. प्रलंबित इ केवायसी शेतकरी यांची यादी वाॕटस अप ग्रुपवर गाव निहाय शेअर करणार असल्याचे तहसीलदार राजेश गिड्डे यांनी सांगितले आहे.








Leave a Reply